RTI-Compliance of Information Act 2005

Last Updated: Thursday, 15 January 2015

माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या अंमलबजावणीबाबत कलम ४ (१) (ख) नुसार सतरा (१७)

बाबींवर नागरिकांसाठी प्रसिध्द करावयाची माहिती.

 

 1. आपली रचना कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.

 2. आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये.

 3. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यांत येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली.

 4. स्वत:ची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्याकडून ठरविण्यांत आलेली मानके.

 5. त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्य पार त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यांत येणारे नियम, विनियम सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख.

 6. त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण.

 7. आपले धोरण तयार करण्याच्या किंवा अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.

 8. आपल्या एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण; आणि त्या मंडळांच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीशी कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कस याबाबतचे विवरण.

 9. आपल्या अधिका-यांची आणि कर्मचा-यांची निर्देशिका.

 10. आपल्या प्रत्येक अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन; तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरदुद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पध्दती.

 11. सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेल्या अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल.

 12. अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभधिका-यांचा तपशील.

 13. ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकरपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील.

 14. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील.

 15. माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणा-या सुविधाचा तपशील, तसेच सार्वजनिक वावरासाठी चाल्विण्यांत येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील.

 16. जनमाहिती अधिका-यांची पदनामे आणि इतर तपशील.

 17. विहित करण्यांत येईल अशी इतर माहिती.

 

Tuesday the 31st. Copyright © 2004-2018MSPGCL ® All Rights Reserved Maintained By: Office of ED-IT, Dharavi, Mumbai
Free Joomla 2.5 templates by New Poker Reviews